व्यायाम केल्याने वेदना न्यून होऊ शकतात का ?

व्यायामामुळे स्नायूंची शक्ती वाढते, लवचिकता सुधारते आणि शरिराची नैसर्गिक ठेवण राखली जाते. त्यामुळे वेदनांपासून मुक्ती मिळवण्यास साहाय्य होते. व्यायाम केल्यामुळे नैसर्गिक वेदनाशामके निर्माण होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

व्यायाम करतांना स्वत:त झालेल्या सकारात्मक पालटांकडे लक्ष द्या आणि स्वतःला प्रोत्साहित करा !

आपल्यात होत असलेल्या लहान पालटांकडे लक्ष देऊन त्यांचे अधूनमधून स्मरण केले, तर व्यायाम करण्यास प्रोत्साहन मिळत रहाते आणि व्यायामाची गुणवत्ताही वाढते. छोट्या; पण महत्त्वाच्या पालटांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

स्नायूंचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करावे ?

सांध्यांची हालचाल सुधरवणार्‍या ‘स्ट्रेचिंग’, योगासने, उदा. पश्चिमोत्तानासन, अधोमुखश्वानासन, गोमुखासन इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश करावा. 

‘स्नायूंचे आरोग्य उत्तम असणे’, म्हणजे काय ?

‘सोप्या भाषेत सांगायचे, तर ‘दैनंदिन कृती सहजतेने आणि कोणताही ताण किंवा वेदना विरहित करू शकणे’, याला ‘स्नायूंच्या आरोग्य उत्तम असणे’, असे म्हणू शकतो. या कृती करण्यासाठी स्नायूंमध्ये ‘शक्ती, लवचिकता आणि सहनशक्ती’…

हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ‘कार्डिओ’ व्यायाम करणे आवश्यक आहे !

‘शरिरातील पेशींना प्राणवायू (ऑक्सिजन) आणि पोषक द्रव्ये यांचा पुरवठा करण्यासाठी रक्ताभिसरण अन् श्वसनप्रणाली, म्हणजे हृदय, फुप्फुसे आणि रक्तवाहिन्या यांची कार्यक्षमता चांगली असणे महत्त्वाचे आहे.

‘व्यायाम आणि मनाची स्थिती’, हे घटक एकमेकांना पूरक कसे असतात ?

‘शरिराला ‘मनाचा आरसा’ म्हटले जाते. मनात येणार्‍या सूक्ष्मातिसूक्ष्म विचारांचा शरिरावर दृश्य आणि अदृश्य परिणाम होत असतो. व्यायामाची गुणवत्ता आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते.

व्यायामाचा १०० टक्के लाभ मिळवण्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे !

वेळेत झोपल्याने झोपेच्या चक्रात योग्य समतोल साधला जाऊ शकतो. व्यायामाचा १०० टक्के लाभ मिळवण्यासाठी, दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.

व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !

काही जणांना नृत्य करायला आवडते, तर काहींना मित्र-मैत्रिणींच्या समवेत खेळण्यात आनंद मिळतो. अशा शारीरिक क्रियांमध्ये सहभागी झाल्याने त्यात आपोआप गोडी निर्माण होईल आणि त्यातून मिळणारा आनंद नियमितपणे व्यायाम करण्यास प्रोत्साहन देईल.

व्यायाम, म्हणजे नैराश्य घालवणारी संजीवनी !

‘नैराश्य आणि उदासीनता घालवण्यासाठी व्यायाम अत्यंत प्रभावी असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. व्यायामामुळे मनाची स्थिती सुधारणारी आणि भावनांचे नियमन..

एकसारखे व्यायाम प्रकार करणे टाळा !

विविध प्रकारचे व्यायाम केल्याने शरिरातील वेगवेगळ्या स्नायूंचा वापर होतो आणि एकाच स्नायूवर सतत ताण न येता शरिराची शक्ती, लवचिकता, सहनशक्ती, हृदय फुप्फुसे यांची कार्यक्षमता हे सर्व घटक संतुलितपणे सुधारतात, तसेच विविधता आणल्यामुळे व्यायामाचा कंटाळा येत नाही