वनक्षेत्र वाढ आणि जैवविविधता टिकवणे यांसाठी गोवा सरकार बांधील ! – मुख्यमंत्री

वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२१ च्या भारत सरकारच्या वन अहवालानुसार गोव्यातील वनक्षेत्रामध्ये ७ चौरस किलोमीटरची वाढ ! वनीकरण निधी व्यवस्थापन योजनेची कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने वनक्षेत्रात वाढ होत आहे.

वनक्षेत्रांना लागलेल्या आगीमुळे ४ कोटी १८ लाख चौरसमीटर भूमीवर विपरीत परिणाम ! – वनमंत्री विश्वजीत राणे

फोंडा तालुक्यात भोम-अडकोण येथील डोंगराला आग लागली आहे. फोंडा अग्नीशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

सोलापूर येथे अनुमतीविना झाडे तोडल्याने अधिकार्‍याला ५ लाख रुपये दंड !

शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची अनुमती न घेता तोडल्याविषयी पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रत्येकी १ वृक्ष १ लाख रुपये यानुसार ५ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

गोवा : साळावली धरणाची उंची वाढवल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार असल्याची पर्यावरणतज्ञांची भीती

साळावली धरणाची उंची वाढवल्यास पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न सुटणार नाही; मात्र याने पर्यावरण नष्ट होणार. याउलट सरकारने ओसाड भूमीवर वृक्षारोपण करून वृक्षांची वाढ करण्यावर भर दिला पाहिजे.

भविष्यात सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल ! – धीरज वाटेकर, पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते

आपण स्वतःहून एखाद्या कुंडीत किंवा भूमीत बियाणे घालून झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केल्यास ते झाड आपल्याशी हितगुज करत असल्याचे जाणवेल. यातून आपल्याला निसर्गाशी एकरूप होता येईल, ‘वृक्षरक्षक’ होता येईल.

वनक्षेत्र पुन्हा बहरण्यासाठी ५० हून अधिक वर्षांचा कालावधी लागेल ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर

गोव्यात ५ ते १४ मार्च या कालावधीत आगीच्या एकूण सुमारे ७२ घटना घडल्या ! म्हादई अभयारण्यात साट्रे येथे लागलेली आग पुढे अभयारण्यातील अन्य भाग आणि जवळच्या परिसरात पसरून सहस्रो वर्षांची जैवविविधता काही क्षणांत भक्ष्यस्थानी पडली.

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ साकारूया !

‘हा मार्ग जगातील सर्वोत्तम बॉटनिकल कम् जैवविविधता महामार्ग होऊ शकतो’ हे वनस्पतीशास्त्राचा विशेष अभ्यास असलेल्या एका अस्सल कोकणी कृतीशील तज्ञाचे चिंतन आठवले आणि त्यामुळे जागतिक वनदिनाच्या निमित्ताने या लेखाचे, हे प्रयोजन !

वन आणि पर्यावरण यांच्या हानीच्या सर्वेक्षणाला आरंभ !

यासंबंधी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सरकारला सुपुर्द करण्यात येणार आहे. या अहवालात हानीचे सर्वेक्षण करण्यासह वनक्षेत्र पुन्हा बहरण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली जाणार आहे.

भारतीय संस्‍कृती मानवाला निसर्गाचा योग्‍य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी असणे

ज्‍या राष्‍ट्रात पर्यावरणाच्‍या शुद्धीसाठी नियमित गायीच्‍या तुपाची आहुती देऊन (गोघृत) यज्ञ-यागामध्‍ये हवन केले जात असे, तेथे आज गोहत्‍येसाठी पशूवधगृहे उघडण्‍याची अनुमती स्‍वतः सरकारच देत असेल, तर तेथे प्रदूषण होणे, ही आश्‍चर्याची गोष्‍ट नाही !

गोवा : भगवान महावीर अभयारण्यातही पोचली आग !

म्हादई अभयारण्यासह आता भगवान महावीर अभयारण्यातही आगीचा भडका उडाल्याने जैवविविधतेची अपरिमित हानी झाली आहे. येथील पशू-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.