श्वासाविना मनुष्य जीवनाची कल्पनाच व्यर्थ आहे आणि शुद्ध प्राणवायू (ऑक्सिजन) मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे, जो त्याला भौतिकतेच्या मागे धावणार्या आजच्या जगात मिळत नाही, यासाठी मनुष्य अन् त्याची लोभी प्रवृत्तीच दोषी आहे.
१. निसर्गाचा योग्य रितीने आणि कृतज्ञताभावाने वापर कशा प्रकारे केला जावा ? हे आपले वेद अन् पर्यावरण सापेक्ष संस्कृती यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला समजावणारे आहे. असे असतांना राष्ट्रात वायू प्रदूषणाचे संकट आहे, ती एक विसंगती नाही, तर आणखी दुसरे काय आहे ? ही विसंगती आपल्या राष्ट्रीय मूळ चरित्रापासून भ्रष्ट झाल्यामुळेच उत्पन्न झाली आहे.
२. ज्या राष्ट्रात पर्यावरणाच्या शुद्धीसाठी नियमित गायीच्या तुपाची आहुती देऊन (गोघृत) यज्ञ-यागामध्ये हवन केले जात असे, तेथे आज गोहत्येसाठी पशूवधगृहे उघडण्याची अनुमती स्वतः सरकारच देत असेल, तर तेथे प्रदूषण होणे, ही आश्चर्याची गोष्ट नाही !
३. ज्या संस्कृतीमध्ये वृक्ष पूजन करण्याची परंपरा होती, आज तेथेच विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड निरंतर चालू आहे, तसेच अनेक वर्षांपासून देशात प्रतिवर्षी अनेक ‘रोपे’ लावली जातात आणि भ्रष्टाचाराचा राक्षस पोसला जात आहे, त्यातील अधिकांश रोपांचे वृक्ष होऊ शकत नाहीत. असे असेल, तर प्रदूषणापासून मुक्ती कशी मिळेल ?
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)