पुणे नदी सुधार योजनेमध्ये केवळ झुडूप प्रकारातील झाडे तोडण्यात येणार ! – महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण
नदी सुधार प्रकल्पामध्ये ६ ते ७ सहस्र झाडे तोडण्यात येणार असल्याची चर्चा पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पुणेकर यांच्यात असल्याने २९ एप्रिल या दिवशी ‘चिपको’ आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वरील सूत्र स्पष्ट केले आहे.