वनक्षेत्र वाढ आणि जैवविविधता टिकवणे यांसाठी गोवा सरकार बांधील ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, ८ एप्रिल (वार्ता.) – वनक्षेत्र वाढवणे आणि त्यातील जैवविविधता बळकट करणे, यांसाठी विविध उपक्रम राबवण्यास गोवा सरकार बांधील असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 ते म्हणाले,

‘‘वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२१ च्या भारत सरकारच्या वन अहवालानुसार गोव्यातील वनक्षेत्रामध्ये ७ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. सध्या गोव्यातील ६०.६२ टक्के भूमी वनक्षेत्राखाली आहे. वनीकरण निधी व्यवस्थापन (कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट) योजनेची कार्यवाही करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असल्याने वनक्षेत्रात वाढ होत आहे. अलीकडेच गोव्यात वनांना लागलेल्या आगीमुळे जवळजवळ ४१ सहस्र ८०० चौरस मीटर भूमीवर विपरीत परिणाम झाला आहे. भारतीय वन कायद्यानुसार सध्या वनांचे संरक्षण केले जात आहे.