‘पालट घडवूया’ अभियानाद्वारे राज्‍यातील ६४ सहस्र शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी देणार स्‍वच्‍छतेचा संदेश !

विद्यार्थी ‘स्‍वच्‍छता मॉनिटर्स’ म्‍हणून काम करणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे २३ ऑगस्‍ट या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या अभियानाद्वारे राज्‍यातील स्‍वच्‍छतेमध्‍ये आमूलाग्र पालट होईल’, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या भेटीनंतर ‘के.ई.एम्.’ रुग्‍णालयाच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामाला १२ घंट्यांत प्रारंभ !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ ऑगस्‍टच्‍या मध्‍यरात्री परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्‍या ‘के.ई.एम्.’ रुग्‍णालयाला अचानक भेट दिली. या वेळी मुख्‍यमंत्र्यांनी रुग्‍णालयातील ६ विभाग दुरुस्‍त करण्‍याची सूचना केली होती. त्‍यांच्‍या सूचनेनंतर १२ घंट्यांत या सर्व विभागांच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामाला प्रारंभ करण्‍यात आला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य व्हावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र

आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्‍यात ‘कांदा महाबँक’ ही संकल्‍पना राबवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

प्रत्‍यक्ष अणि अप्रत्‍यक्षरित्‍या ६० सहस्रांहून अधिक रोजगार निर्माण होईल. यामुळे कांद्याचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी मार्गी लागेल. कांद्याच्‍या बाजारभावाची घसरण रोखण्‍यासाठी विविध शिफारशींवरही विचार आहे.

रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! – राज्‍यपाल रमेश बैस

या वेळी एकनाथ शिंदे यांनी ‘गरजवंताच्‍या साहाय्‍यासाठी देव नेहमी धावतो. टाटा म्‍हणजे अढळ विश्‍वास, गुणवत्तेची निश्‍चिती आणि सामाजिकतेचे प्रचंड भान आहे’, अशा शब्‍दांत रतन टाटा यांचे कौतुक केले.

रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! – राज्यपाल रमेश बैस

रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव !

उद्योगपती रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान !

उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा पुरस्कार देण्यात आला.

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य करता आले, अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मंत्रालयात स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने ध्‍वजारोहण करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

भाजपकडून युतीचा प्रस्‍ताव; मात्र अद्याप निर्णय नाही ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

भाजपने आपल्‍यापुढे युतीचा प्रस्‍ताव ठेवला आहे; पण भाजपसमवेत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्‍यामुळे भाजपच्‍या प्रस्‍तावावर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्‍यस्‍फोट मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी केला.

केंद्र सरकारच्या साहाय्याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्य ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.