मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारचा ‘#उद्योगरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल आदरणीय श्री. रतन टाटा यांचे त्रिवार अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. भारतीयांसाठी टाटा म्हणजे अढळ विश्वास! टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे गुणवत्तेची खात्री. टाटांची नाममुद्रा ही… pic.twitter.com/UnEjXSjUua
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 19, 2023
उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ, ‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे सन्मानचिन्ह, २५ लाख रुपयांचा धनादेश आणि रतन टाटा यांचे पोट्रेट (चित्र) त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केले.