मुंबई – राज्याला उद्योग क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या साहाय्याने शेतकर्यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्य करता आले, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला संदेश…#स्वातंत्र्य_दिन #भारतीय_स्वातंत्र्य_दिन #IndependenceDay #India#JayHind #जय_हिंद #IndependenceDay2023 pic.twitter.com/imh9dvIY9x
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 15, 2023
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘आधी सरकारकडून लोकांसाठी एक रुपयाचा साहाय्यानिधी घोषित झाला, तर १५ पैसे हातात पडायचे; मात्र आता असे होत नाही. शेतकर्यांसाठी आम्ही केवळ १ रुपयांत पीक विमा योजना चालू केली. ही एक ऐतिहासिक योजना असून त्यामुळे पुष्कळ मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना त्याचा लाभ होत आहे.’’