गणेशोत्‍सवानिमित्त राज्‍यातील मिरवणूक मार्गाच्‍या डागडुजी करण्‍याविषयीचा शासनाचा आदेश !

गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने राज्‍यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्‍याचा आदेश राज्‍यशासनाने दिला आहे. ४ सप्‍टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी आणि गणेशोत्‍सव यांनिमित्त मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेण्‍यात आली.

जालन्याच्या घटनेची अपर पोलीस महासंचालकडून चौकशी  ! – मुख्यमंत्री

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करत आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

अनधिकृत फलक हटवण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गल्लीबोळातील कचर्‍यावरून महापालिका प्रशासनाला खडसावल्यानंतर आता स्वच्छतेसमवेतच अनधिकृत फलक हटवण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम घेण्याचे महापालिकेने ठरवले आहे. 

‘चंद्रयान ३’ आणि ‘आदित्य एल् १’ मोहिमांमुळे भारत बलशाली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणार्‍या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून ‘वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य देश’ अशी ओळख निर्माण झाली आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सराला बेटाच्‍या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि नगर जिल्‍ह्यांतील भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या सराला बेट अर्थात् गोदाधामला जाण्‍यासाठी पक्‍के रस्‍ते अन् अंतर्गत सोयीसुविधांसाठी अनुमाने १५ कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ ऑगस्‍ट या दिवशी येथे केली.

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्रात पालट !

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सागरी क्षेत्राच्या सुधारित आराखड्याला (सी.झेड.एम्.पी.) केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे.

यापुढे किनारपट्टी भागात घरे बांधता येणार आणि व्‍यवसायही करता येणार !

सुधारित आराखड्यामुळे ही अनुमती मिळणे सुलभ होणार आहे. निवासी घरांसाठी ३०० वर्ग मीटरपर्यंत बांधकामांसाठी स्‍थानिक नियोजन प्राधिकरण अनुमती देणार आहे.

 शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरीक्षेत्रात पालट !

हा आराखडा मार्गी लागल्यामुळे कोकणातील ५ जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प, तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील. यामुळे पायाभूत सुविधांच्या कामांनाही चालना मिळेल.

शिवसेनेच्‍या आमदारांनी विधानसभा अध्‍यक्षांकडे सादर केले ६ सहस्र पानांचे लेखी उत्तर !

विधानसभा अध्‍यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्‍याचे निर्देश विधानसभा अध्‍यक्षांना दिले होते; मात्र नार्वेकर यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्‍यामुळे ठाकरे गटाने पुन्‍हा सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.