गोवा : श्री सरस्वती पूजनाची अनुमती नाकारली !

हिंदूंच्याच देशात विद्येची देवता असलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाला महाविद्यालयाकडून दुसर्‍या वर्षीही अनुमती न मिळणे दुर्दैवी ! आतापर्यंत नागरिकांना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजल्याचा हा परिणाम आहे !

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्वरी येथे विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन

या केंद्रामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे निरीक्षण होईल. शिक्षकांनी काय शिकवले ? विद्यार्थी काय शिकत आहेत ? या गोष्टींच्या नोंदी होतील आणि शिक्षकांनी अध्यापनात सुधारणा करणे आवश्यक असल्यास निर्देश दिले जातील.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पुणे विद्यापिठातील ‘संरक्षण आणि सामरिक विभागा’ची मान्यता !

‘एम्.ए. इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डींग’ (‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य संस्थापना’, या विषयामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी), या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे.

सिंधदुर्ग : बांदा केंद्रशाळेसाठी इमारत मिळावी, यासाठी पालकांचे ‘शाळा बंद’ आंदोलन चालू !

शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?

सिंधुदुर्ग : शिक्षक मिळावा, यासाठी पालकांनी मालवण पंचायत समितीच्या कार्यालयात भरवली शाळा

जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून, एका शाळेत शिक्षक अधिक असल्यास त्यातील एखादा शिक्षक दुसर्‍या शाळेत पाठवून वेळ मारून नेली जात आहे !

Life Skills Course : देशभरातील महाविद्यालयांत चालू होणार ‘जीवन कौशल्य अभ्यासक्रम’ !

केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !

पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाने स्‍वमान्‍यतेचे २३८ शाळांचे प्रस्‍ताव फेटाळले !

जिल्‍हा परिषदेच्‍या शैक्षणिक विभागाकडे स्‍वमान्‍यतेसाठी ३२० शाळांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ ११ शाळांना ऑनलाईन पद्धतीने स्‍वमान्‍यता प्रमाणपत्र मिळाले

सिंधुदुर्ग : झाराप येथील शाळेत शिक्षक मिळावा, यासाठी पालक आजपासून पुन्हा आंदोलन करणार ! 

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या जनजागृतीसाठी २६२ उच्चशिक्षण संस्थांमधील ७२१ विद्यार्थ्यांची निवड !

निवडलेल्या विद्यार्थी स्वयंसेवकांची सूची विद्यापीठ अनुदान आयोगाने घोषित केली आहे.

प्राचार्यांना ‘फादर’ म्‍हणायला लावल्‍याप्रकरणी ‘शंभुदुर्ग प्रतिष्‍ठान’ने खडसावले !

धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र म्‍हणवल्‍या जाणार्‍या भारतातील शाळेत प्राचार्यांना ‘फादर’ म्‍हणण्‍यास सांगितले जाणे अयोग्‍य ! देशातील अन्‍य शाळा किंवा महाविद्यालये येथे असा प्रकार होत नाही ना ?