शालेय विद्यार्थ्यांचा अमली पदार्थ व्यवहारामध्ये सहभाग असल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करा ! – बाल हक्क संरक्षण आयोग

शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व्यवसायात गोवले जात आहे. अशा गंभीर प्रकरणांचे अन्वेषण पोलीस स्वतःहून का करत नाहीत ? मागणी का करावी लागते ?

‘महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’मुळे महिलांचे सबलीकरण ! – दत्ताजी थोरात

महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे अनेक अबला महिला सबला झाल्या आहेत. त्यामुळे त्या आज विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत, असे प्रतिपादन ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’चे शाळा समिती अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना साधना न शिकवल्याचा दुष्परिणाम !

फलक प्रसिद्धीकरता आंध्रप्रदेश मध्यवर्ती परीक्षा मंडळाकडून इयत्ता ११ वी आणि १२ वीचा निकाल घोषित करण्यात आल्यावर अवघ्या ४८ घंट्यांत ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर अन्य २ विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/678115.html

पिंपरी (पुणे) महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील ‘ई क्लासरूम’ योजना बंदस्थितीत

महापालिकेच्या शाळांमध्ये संगणक, विज्ञान आणि गणित यांच्या वर्गखोल्या सिद्ध करण्यात आल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रारंभीचे काही दिवस सोडल्यास अनेक तांत्रिक अडचणींमुळे ‘ई लर्निंग’ सध्या बंद पडल्याचे दिसून येत आहे.

चांदूर रेल्‍वे येथील मुंदडा महाविद्यालयावर प्रशासक नेमणार !

अशोक शिक्षण संस्‍थेद्वारा संचालित चांदूर रेल्‍वे येथील मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्‍य, विज्ञान महाविद्यालयावर प्रशासक नेमण्‍याच्‍या निर्णयावर विद्यापिठाने शिक्‍कामोर्तब केले आहे.

‘पहिले पाऊल – शाळापूर्व तयारी’ अभियानात सर्वांनी सहभागी व्‍हावे ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

राज्‍य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्‍याचे काम ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानांतर्गत चालू आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांनी ‘गुरुकुल विश्व ॲप’चे लोकार्पण केले. या ॲपमुळे पूर्वप्राथमिक शाळांची नोंदणी करणे सुविधाजनक तसेच ऑनलाईन नोंदणीद्वारे पूर्वप्राथमिक शाळांना अनुमती देणे सहज शक्य होणार आहे.

शिक्षणसंस्‍थांशी संबंधित कामात दिरंगाई झाल्‍यास अधिकार्‍यांच्‍या पदोन्‍नतीच्‍या वेळी विचार करणार !

शासकीय शाळांमधील शिक्षकांचे स्‍थानांतर, शाळांचे विविध प्रस्‍ताव आदी कामे त्‍या त्‍या वेळी पूर्ण न केल्‍यास सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्‍या ‘सर्व्‍हिस बूक’मध्‍ये त्‍याची नोंद करण्‍यात येईल आणि पदोन्‍नतीच्‍या वेळी या गोष्‍टी लक्षात घेतल्‍या जातील

इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात आता ‘कृषी’ विषयाचा समावेश !

इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील शाळांमध्ये शिकवला जाणार शीख धर्म !

अमेरिकेतील आतापर्यंत १६ राज्यांतील शाळांमध्ये शीख धर्म शिकवण्यात येत होता. व्हर्जिनिया शीख धर्म शिकवणारे १७ वे राज्य असणार आहे.