अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील शाळांमध्ये शिकवला जाणार शीख धर्म !

शीख धर्म शिकवणारे व्हर्जिनिया अमेरिकेतील १७ वे राज्य !

व्हर्जिनिया (अमेरिका) – व्हर्जिनिया राज्याने शाळांमध्ये शीख धर्म शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शीख धर्म, त्यांतील प्रथा आणि परंपरा यांची माहिती देण्यात येणार आहे.

अमेरिकेतील आतापर्यंत १६ राज्यांतील शाळांमध्ये शीख धर्म शिकवण्यात येत होता. व्हर्जिनिया शीख धर्म शिकवणारे १७ वे राज्य असणार आहे.