औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, म्हणजे देशात इस्लामी राजसत्तेची मुहूर्तमेढ रोवणे आहे. भारताचा इतिहास लिहितांना परकीय आक्रमकांच्या क्रौर्याचा आणि अत्याचाराचा इतिहास दडपला, लपवला. परकीय आक्रमकांना प्रातःस्मरणीय ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. हिंदूंच्या शौर्याला क्रौर्य ठरवण्यात आले. सज्जन आणि सहिष्णू असलेल्या हिंदूंना दुर्जन अन् असहिष्णू ठरवण्याचा घाट घातला गेला. आजही त्यात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना नेहरूंनी ‘लुटारू’ आणि ‘दरोडेखोर’ ठरवले. मोहनदास करमचंद गांधींनी ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हणून छत्रपती शिवरायांची अपकीर्ती केली. याचाच अर्थ हिंदूंचे शौर्य आणि पराक्रम यांना ‘मानवतेचे शत्रू’ ठरवण्यात आले, तर आजच्या काळात छत्रपती शिवरायांना ‘निधर्मीवादी’ ठरवण्याचा घाट घातला जात आहे. हा निधर्मीवाद हिंदूंचे अस्तित्वच नष्ट करायला बसला आहे. देशाच्या राष्ट्रहिताला पोषक असलेल्या विचारसरणीचा पुरस्कार करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष पुढे येतांना दिसत नाहीत, हीच या देशाची शोकांतिका आहे.
१. औरंगजेबाची विचारसरणी मदरशांमधून शिकवली जात असल्याने ते बंद करणे राष्ट्रहिताचे !
औरंगजेबाची विचारसरणी मदरशांमधून अजूनही जिवंत ठेवली जात आहे; म्हणूनच मदरसांमधून शिक्षण घेऊन बाहेर आलेले मुसलमान या देशाशी एकनिष्ठ राहू इच्छित नाहीत. राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी औरंगजेबाचे विचार त्यांना प्रतिबंध करतात; म्हणूनच औरंगजेब हा खलनायक आहे. या खलनायकाच्या विचारांचे संस्कार मदरशांमधून केले जातात; म्हणून ते सर्व मदरसे बंद केले पाहिजेत आणि तसे करणे राष्ट्रहिताचे आहे.

२. औरंगजेबाचे क्रौर्य !
औरंगजेबाच्या क्रौर्याचे अनेक दाखले आपल्याला इतिहासात आढळतात. औरंगजेबाला हिंदुस्थानचे संगीतही कानावर पडू नये, असे वाटत होते. हिंदूंची संस्कृती, ‘हिंदूंचे संगीत भूमीत इतक्या खोलवर पुरा की, त्यांच्या संगीताचे सूरही कानावर पडता कामा नयेत’, अशी आज्ञा औरंगजेबाने त्याच्या सैन्याला दिली होती. औरंगजेबाने त्याच्या भावाला नग्न करून त्याची देहलीतील रस्त्यावरून धिंड काढली होती; कारण त्याने उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला होता.
३. गुरु तेगबहादूर यांचा शिरच्छेद करवणारा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ करणारा औरंगजेब !
काश्मीरमधील हिंदु पंडितांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळाचा वापर करून त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले. या अत्याचारापासून स्वतःची सुटका व्हावी, यासाठी काश्मीरमधील पंडितांनी शिखांचे ९ वे गुरु तेगबहादुर यांच्याकडे साहाय्य मागितले. काश्मीरमधील हिंदु बांधवांसाठी गुरु तेगबहादूर यांनी औरंगजेबाशी लढण्याचा निश्चय केला. औरंगजेबाने त्यांना अटक करून ३-४ मास कारागृहात ठेवले. त्यांच्यापुढे पुढील ३ पर्याय ठेवले –
अ. कलमा वाचून मुसलमान होणे
आ. काहीतरी चमत्कार दाखवणे
इ. मरणाला सामोरे जाणे
धर्मनिष्ठ असलेल्या गुरु तेगबहादूर यांनी मृत्यू स्वीकारला; पण धर्मांतर केले नाही. याचा संताप येऊन औरंगजेबाने देहलीच्या चांदणी चौकात जल्लाद जलालुद्दीन यांच्या करवी गुरु तेगबहादूर यांचा शिरच्छेद करवला. तो दिवस होता ११ नोव्हेंबर १६७५ ! याच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ करून त्यांना जिवे मारले. काशीविश्वेश्वराचे मंदिर तोडणाराही औरंगजेबच होता.
४. औरंगजेबाच्या विचारसरणीच्या मुसलमानांनी घातलेला देशविघातक हैदोस !
अशा या राक्षसी प्रवृत्तीच्या औरंगजेबाला नायक म्हणून पूजले जात असेल, तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे. ज्यांच्या अंगात औरंगजेबाचे रक्त सळसळते आहे, त्यांचा सरकारने कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. अन्यथा ही विषवल्ली संपूर्ण देश नष्ट केल्यावाचून रहाणार नाही. मुसलमानांनी औरंगजेबाला आदर्श मानून केलेले मूर्तीभंजन विसरता येणार नाही. हिंदु आणि बौद्ध या धर्मांचा नाश करण्याचा प्रयत्न या औरंगजेबाच्या विचारसरणीने केला आहे.
वर्ष २००१ मध्ये तालिबानने बुद्धांची मूर्ती तोफेने उडवली होती. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांनी घातलेला हैदोस अगदी अलीकडचाच आहे. संपूर्ण युरोपला या विषारी अजगराने विळखा घातला आहे. ही परिस्थिती औरंगजेबाला नायक म्हणून डोक्यावर घेणार्या त्याच्या अनुयायांनी निर्माण केली; म्हणूनच औरंगजेब हा खलनायक आहे. त्याचे नामोनिशाण हिंदुस्थानच्या भूमीतून नष्ट केले, तरच आपण सुखाने जगू शकू.
५. ‘राज्यघटना धोक्यात आहे’, अशी आरडाओरड करणारे आता गप्प का आहेत ?
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत या औरंगजेबाच्या अनुयायांनी पोलिसांवर आक्रमण केले. पोलीस अधिकार्यांवर कुर्हाडीचा घाव घातला. त्यांचे हे कृत्य घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये बसणारे आहे. इतर वेळा ‘हिंदुस्थानची राज्यघटना धोक्यात आहे’, अशी आरडाओरड करणार्यांची तोंडे आता गप्प का आहेत ? आता त्यांच्या कंठातून एकही शब्द बाहेर का पडत नाहीत ? औरंगजेबाच्या विचारसरणीला अशा प्रकारे मूकपणे पाठिंबा देणारेही या देशासाठी घातक आहेत, असा जर कुणाचा समज झाला, तर यात दोष कुणाचा ?
६. औरंगजेबाला नायक मानणार्यांचे नागरिकत्व रहित करा !
मुसलमानांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला वेळीच ठेचून नष्ट करण्यासाठी सरकारने सिद्धता करावी आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व अन् स्वातंत्र्य यांचे रक्षण करावे. देशातील पोलीस अधिकारीसुद्धा सुरक्षित नसतील, तर देशातील सामान्य जनता स्वतःच्या संरक्षणासाठी कुणाकडे आशेने पाहू शकेल ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
औरंगजेब हा खलनायक असून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे या देशाचे नायक आहेत. हा विचार ज्यांना मान्य नसेल, त्यांना या देशाचे नागरिकत्व देता येणार नाही, तसेच देशाचे नागरिक असूनही औरंगजेबाला जे नायक मानत असतील, त्यांचे नागरिकत्व रहित करावे. सरकारने धाडसाने हा निर्णय घ्यावा आणि छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करून आपण त्यांचे अनुयायी आहोत, असे देशाच्या शत्रूला ठणकावून सांगितले पाहिजे. हीच भारतीय जनतेची सांप्रत काळातील अपेक्षा आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली.