वर्ष २०१७ पासून राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद

पणजी, २५ मार्च (वार्ता.) – राज्यात वर्ष २०१७ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद झाली आहेत. या प्रकरणांची वर्षवार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. वर्ष २०१७ मध्ये १६८ प्रकरणे, वर्ष २०१८ मध्ये २२२ प्रकरणे, वर्ष २०१९ मध्ये २१९ प्रकरणे, वर्ष २०२० मध्ये १४८ प्रकरणे आणि चालू वर्षी फेब्रुवारी मासापर्यंत १८ प्रकरणे नोंद झाली आहेत. अमली पदार्थविरोधी पथक किंवा गोवा पोलीस यांनी वर्ष २०१७ मध्ये ८१८ ठिकाणी, वर्ष २०१८ मध्ये १ सहस्र ६ ठिकाणी, वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र १७९ ठिकाणी, वर्ष २०२० मध्ये ८९१ ठिकाणी आणि चालू वर्षी फेब्रुवारी मासापर्यंत १६५ ठिकाणी छापे टाकले. (यातील किती जणांवर कारवाई झाली ? आणि किती जण जामिनावर सुटून पुन्हा तेच गुन्हे करत आहेत ? तेही पहाणे महत्त्वाचे आहे. केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील ! – संपादक)

चालू वर्षी फेब्रुवारीपर्यंत महिला आणि मुले यांच्यावरील अत्याचारांचे ७८ गुन्हे प्रविष्ट

चालू वर्षी फेब्रुवारीपर्यंत २३४ अनैसर्गिक मृत्यू, २ सायबर गुन्हे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांमधील सदस्यांवर अत्याचार केल्याची २ प्रकरणे, महिला आणि मुले यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे ७८ गुन्हे, स्थलांतरित कामगारांच्या विरोधात ३२ गुन्हे आणि कोरोना महामारीशी संबंधित नियमांचे पालन न केल्याच्या प्रकरणी २ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. गतवर्षी १ सहस्र ३६९ अनैसर्गिक मृत्यू, ४१ सायबर गुन्हे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांमधील सदस्यांवर करण्यात आलेल्या अत्याचाराची ४ प्रकरणे, महिला आणि मुले यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे

२८९ गुन्हे, स्थलांतरित कामगारांच्या विरोधात २२२ गुन्हे आणि कोरोना महामारीशी संबंधित नियमांचे पालन न केल्याच्या प्रकरणी

१ सहस्र ५३१ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले होते. (शांततापूर्ण म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्यात ही स्थिती का उद्भवली ? याचेही अन्वेषण होणे महत्त्वाचे आहे. गुन्हेगारांमध्ये बाहेरील राज्यांतील किती जण आहेत आणि गोमंतकीय किती आहेत, तेही शोधून काढून योग्य ती उपाययोजना करायला हवी ! – संपादक)