केळघर (जिल्हा सातारा) येथे सीमा शुल्क विभागाची धाड

२३ किलो गांजा शासनाधीन

सातारा, १९ मार्च (वार्ता.) – सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तावळी तालुक्यातील केळघर येथे एका ‘फार्म हाऊस’वर धाड टाकण्यात आली. तेथे २३ किलो ६३१ ग्रॅम इतका गांजा आढळून आला असून तो शासनाधीन करण्यात आला आहे.

या गांजाचे बाजारमूल्य अनुमाने ३ लाख रुपये एवढे आहे. या प्रकरणी केळघर येथील ‘फार्म हाऊस’चे मालक संतोष पार्टे यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पार्टे यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.