सोनाली फोगाट यांच्या हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावे !

खाप पंचायतीच्या बैठकीनंतर सोनाली यांच्या मुलगीने गोवा पोलिसांच्या अन्वेषणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आईची हत्या करण्यामागे सुधीर संगवानचा नेमका हेतू काय होता ? हे गोवा पोलिसांना अद्याप शोधून काढता आलेले नाही !

अमली पदार्थ आता राज्यातील गावागावांत !

दक्षिण गोव्यासमवेतच राज्यातील गावागावांत अमली पदार्थ पोचले आहेत. खेड्यांमध्ये युवावर्ग अमली पदार्थांच्या आहारी जात आहे आणि अमली पदार्थ व्यवसायाविषयी तक्रार करूनही पोलीस निष्क्रीय असतात, अशा जागरूक नागरिकांच्या तक्रारी आहेत.

कोलकात्यातून २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या विरोधात कोलकाता येथे केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

गोवा : हणजुणे येथील वादग्रस्त कर्लिस उपाहारगृहाचा बहुतांश भाग पाडला

कर्लिस उपाहारगृह पाडण्यासाठी आलेला खर्च उपाहारगृहाचा मालक आणि निष्क्रीय संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून वसूल करा !

हणजुणे येथील वादग्रस्त ठरलेले कर्लिस उपाहारगृह पाडण्यास राष्ट्रीय हरित लवादाकडून मान्यता

वर्ष २००५ मध्ये केलेल्या तक्रारीवर वर्ष २०१६ मध्ये निर्णय !,आणि वर्ष २०२२ मध्ये राष्ट्रीय हरित लवाद त्याला मान्यता देत आहे. या कूर्मगतीने चालणार्‍या प्रशासकीय कारभारातून कधी गैरकारभार किंवा अतिक्रमणे बंद होतील का ?

‘गोवा राज्य अमली पदार्थ सेवनासाठी नाही’, असा कडक संदेश सरकार पर्यटकांना देऊ इच्छिते ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यातील पोलिसांनी ३ प्रमुख अमली पदार्थ व्यावसायिकांना अटक केली असून यामुळे अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा बसेल. राज्य सरकारने अमली पदार्थ व्यावसायिकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम चालू केली आहे.

गोव्यात ३ मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांना अटक : ‘पीट एन्डीपीएस्’ कायद्यानुसार १ वर्ष जामीन नाही

हा कायदा आधीच लागू केला असता, तर अमली पदार्थ व्यवसाय एवढा फोफावला नसता ! प्राण कंठाशी आल्यावर नव्हे, तर आधीच उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हेरॉईन आणि अफू यांचा साठा केला जप्त

पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.

देहली येथून १ सहस्र २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त : दोघा अफगाणी नागरिकांना अटक  

देहली पोलिसांच्या विशेष शाखेने दोघा अफगाणी नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून ३१२.५ किलोग्राम मेथामफेटामाईन आणि १० किलोग्राम हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

गोवा पोलिसांचे अमली पदार्थ व्यावसायिकांशी साटेलोटे !

अमली पदार्थ निगडित अन्वेषणासाठी गोवा पोलिसांचे आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचा आरोप भाग्यनगर पोलिसांनी केला आहे. भाग्यनगर पोलिसांचा हा आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहे.