गुजरात आतंकवादविरोधी पथकाला मिळाली होती माहिती !
कोलकाता – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या विरोधात कोलकाता येथे केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. दुबई येथून ‘गिअर बॉक्स’मध्ये लपवून ४० किलो अमली पदार्थ भारतात आणले जात असल्याची माहिती गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
The ATS team had received a specific information about a scrap consignment imported in February is lying at the docks of the Kolkata sea port since landing, and it carries drugs https://t.co/WMCIomfqHV
— Business Standard (@bsindia) September 10, 2022
मागील काही मासांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथकाकडून अमली पदार्थांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात ३६ गिअर बॉक्सपैकी अमली पदार्थांच्या बॉक्सची ओळख पटण्यासाठी १२ गिअर बॉक्सना पांढर्या रंगाची खूण करण्यात आली होती. अद्यापही कारवाई पूर्ण झाली नसून इतर गिअर बॉक्स तपासण्यात येत असल्याची माहिती कोलकाता पोलीस महानिरिक्षक भाटिया यांनी दिली आहे.