निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक !

अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग असणे म्हणजे पोलिसांनीच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ! अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

माहेरघर विद्येचे कि नशेचे ?

राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थ मुक्त करायचे ठरवले आहे, ही निश्चितच चांगले; परंतु हेच यापूर्वीच केले असते, तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते.

Goa International DrugRacket Busted गोव्यातून कार्यरत असलेले अमली पदार्थ व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त !

भारतात अवैधपणे विदेशी नागरिकांना वास्तव्य करू देणार्‍या आणि कसून चौकशी न करता त्यांना सोडणार्‍या संबंधित पोलिसांवरही कारवाई होणे आवश्यक !

NewZealand Reverses Tobacco Ban : न्यूझीलंडमधील नवनिर्वाचित सरकारने तंबाखूवरील बंदी उठवली !

तंबाखूमुळे होणार्‍या मृत्यूंविषयी तज्ञांनी असा निर्णय न घेण्याविषयी सरकारला चेतावणी दिली होती; मात्र असे असतांनाही सरकारने  तंबाखूच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. न्यूझीलंड सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाली आहे.

पोरबंदर (गुजरात) किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त !

समुद्री किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्‍या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे.

२ सहस्र कोटी रुपयांची अमली पदर्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त !

अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि देहली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणारे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

Pune Drug Adict Girls : पुणे येथील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्‍या तरुणींचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !

पुणे येथील ‘ड्रग्ज रॅकेट’च्या अन्वेषणात ‘इंटरपोल’चे साहाय्य !

पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनियाचे नाव समजल्यामुळे त्याच्या अन्वेषणासाठी ‘इंटरपोल’ (आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणारी संघटना)चे साहाय्य घेतले जाणार आहे.

जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले.

Heroin Seized From Veraval Port : वेरावळ (गुजरात) बंदरातून ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पकडण्यात येत असलेले अमली पदार्थ इतके आहे, तर न पकडण्यात आलेले किती असेल, याची कल्पना करता येत नाही !