NewZealand Reverses Tobacco Ban : न्यूझीलंडमधील नवनिर्वाचित सरकारने तंबाखूवरील बंदी उठवली !

वेलिंग्टन (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमधील नवनिर्वाचित सरकारने तंबाखूच्या विक्रीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी जुलैपासून या निर्णयाची कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तंबाखूमुळे होणार्‍या मृत्यूंविषयी तज्ञांनी असा निर्णय न घेण्याविषयी सरकारला चेतावणी दिली होती; मात्र असे असतांनाही सरकारने  तंबाखूच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. लोकांच्या आरोग्यावर होणार्‍या संभाव्य परिणामांमुळे न्यूझीलंड सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाली आहे.

सौजन्य : फर्स्टपोस्ट 

सह आरोग्यमंत्री केसी कॉस्टेलो म्हणाले की,

१. आघाडी सरकार लोकांमधील धूम्रपानाचे व्यसन अल्प करण्यासाठी काम करत आहे, तसेच हे व्यसन सुटण्यासाठी आणि त्यामुळे होणारी हानी अल्प करण्यासाठी वेगळा नियामक दृष्टीकोनही अवलंबत आहे.

२. लोकंना लागलेले धूम्रपानाचे व्यसन सुटण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना काढण्यात येणार आहेत. तरुणांमध्ये धूम्रपानाविषयीचे नियमही कडक केले जातील.