ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन
केवळ वाचन करणाऱ्यांनी त्यांना साधना करणे कसे उपयुक्त आहे, हे समजून घेण्यासाठी काही महिने नियमित साधना करावी. त्यानंतर परत जे आधी जे वाचले होते ते परत वाचून पहावे. त्यांना त्यातून नवीन काहीतरी आकलन निश्चित होईल. त्याची गोडी अधिक असेल. साधनेचा लाभ नेमका कसा होतो हे समजण्याची ही खूण गाठ आहे.