वारकर्यांच्या स्वागत सेवेत २५ हून अधिक धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

हडपसर (पुणे), १३ जुलै (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने वडकी नाका, हडपसर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्या समवेत वारकर्यांच्या स्वागतासाठी भक्तीपूर्ण सेवा उपक्रम राबवण्यात आला. ‘श्री देशमुख महाराज फाऊंडेशन’, पुणे यांच्या सहकार्यामुळे स्वागतासाठी कक्ष उपलब्ध झाला. ११ जुलै या दिवशी पहाटेपासूनच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी आणि सियाराम मंदिर शाखेचे धर्मप्रेमी स्वागत सेवेत कार्यरत होते. या सेवेत एकूण २५ हून अधिक धर्मप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. कक्षस्थळी पू. गुरुदास श्री देशमुख महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पालखी मार्गावरून जाणार्या वारकर्यांचे पुष्पवृष्टी, जयघोष आणि अखंड नामस्मरणाच्या गजरात स्वागत करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या महादेववाडी येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी, तसेच सिंहगड रस्ता परिसरातील हिंदुत्वनिष्ठ यांनी स्वागत उपक्रम सेवेत सहभाग घेतला. सियाराम मंदिर शाखेच्या धर्मप्रेमींनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी आगमनानंतर सर्व कार्यकर्त्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून मनोभावे वंदन केले. या उपक्रमामध्ये ‘श्री देशमुख महाराज फाऊंडेशन’च्या साधक परिवाराचे चांगले सहकार्य लाभले.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर