
मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – वारीमध्ये दुर्घटनेत मृत्यू आल्यास, अपघात झाल्यास, तसेच नैसर्गिक आपत्तीने मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी राज्यशासनाने ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ योजना घोषित केली आहे. १३ जुलै या दिवशी महसूल विभागाकडून याविषयीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्या व्यक्तींसाठी वर्ष २०२२-२०२३ ते २०२५-२०२६ या कालावधीसाठी शासनाने आर्थिक साहाय्य करण्याविषयीचा शासन निर्णय काढला आहे. २७ मार्च २०२३ या दिवशी काढण्यात आलेल्या या शासन निर्णयामध्ये बाधित व्यक्तीला आर्थिक साहाय्य करण्याविषयीचे निकष देण्यात आले आहेत. या शासन निर्णयाच्या आधारेच दुर्घटनेत पीडित वारकर्यांसाठी शासनाने आर्थिक साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !