
पुणे – ‘कोकणस्थ परिवार, पुणे’ यांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे येथे वारकर्यांसाठी विनामूल्य ‘मोबाईल चार्जिंग’ची (भ्रमणभाष भारित करण्याची) सुविधा देण्यात आली. ही सुविधा लक्ष्मी रस्त्यावरील गणेश पेठ पोलीस चौकी शेजारी ‘नेवरेकर हेल्थ होम’ येथे दिली. उपक्रमाचा प्रारंभ कोकणस्थ परिवारचे अध्यक्ष ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमासाठी उत्तम वनारसे, गणेश निकम, पवन नेवरेकर, अधिवक्ता केशव गाडे, अधिवक्ता प्रेम अगरवाल, शीतल नेवरेकर आदींनी विशेष सहकार्य केले. कोकणस्थ परिवाराच्या वतीने पुण्ो येथे गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर