८९ संशयित चोरांना अटक
८९ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास
पुणे – लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. याच गर्दीचा अपलाभ घेत यंदा वारीत चोरीच्या ११ घटनांची नोंद झाली आहे. वारी सोहळ्याला ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी, सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, अद्ययावत यंत्रसामुग्री आणि गुप्त वेशामध्ये पोलिसांची गस्त असतांनाही चोरीच्या घटना घडल्या आहेत. वारीत वावरणार्या ८९ संशयितांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यात ६७ महिला आणि २२ पुरुष यांचा समावेश आहे.
१. या चोरांनी वारकर्यांसारखी वेशभूषा केल्याचे निदर्शनास आले. ११ चोर्यांपैकी केवळ ९ चोर्या या हडपसर परिसरात घडल्या. महिला वारकर्यांच्या गळ्यातील एकूण ८९ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. यामध्ये ९ महिलांच्या गळ्यातील २ ते २४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
२. विश्रामबाग, समर्थ, शिवाजीनगर, वानवडी आणि खडकी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही चोरीचे गुन्हे नोंद झाले आहेत.
३. हडपसर येथे एका वारकर्याचा भ्रमणभाष चोरण्याचा प्रयत्न केला. लोकांनी सतर्कता दाखवल्यामुळे २ संशयितांना रंगेहात पकडण्यात आले.

सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर