सुदैवाने जीवितहानी टळली !

सावंतवाडी – तालुक्यातील डेगवे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक २ चे छत १२ जुलैच्या मध्यरात्री कोसळले. ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. असे असले, तरी शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे सांगून येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात इतर कुठेही होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ सर्व जुन्या आणि जीर्ण शाळांची संरचनात्मक तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
ही शाळा भारतीय जनता पक्षाचे बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, तसेच माजी सरपंच प्रवीण देसाई यांच्या प्रभागात येते. सत्ताधारी भाजप नेत्यांच्या कार्यक्षेत्रात जर जिल्हा परिषद शाळांची अशी दुरवस्था असेल, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पहाणी केली. ‘शाळेच्या इमारतीची दु:स्थिती पहाता विद्यार्थ्यांची तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे व्यवस्था करावी, तसेच इमारतीची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा’, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर