खालिद नावाच्या मुलाला ‘अफझलखान’ चिडवले !
(टीप : ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून चित्रपट, तसेच डिजिटल साहित्य पोचवणारे माध्यम)
मुंबई – हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता ‘ॲपल टीव्ही’, ‘बूक माय शो’, ‘यू ट्यूब’ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राज प्रीतम मोरे, लेखक कैलास वाघमारे आणि निर्माते मायकल थेवर हे आहेत.
या चित्रपटात खालिद नावाच्या मुसलमान मुलाला शाळेत ‘अफझलखान’ म्हणून चिडवले गेल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे समाजात धार्मिक आणि सामाजिक दुरावा वाढत जातो, असे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. तो मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा शोध घेतो, असे दाखवले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा हिंदुत्वनिष्ठांनी या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.

सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर