
फरीदाबाद (हरियाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ जून ते ४ जुलै या कालावधीत येथील श्री सनातन धर्म मंदिर, एच्.आय.जी. पार्क, सेक्टर २९ आणि ३ जी पार्क, सिटीझन वेल्फेअर असोसिएशन, एन्.आय.टी. ३ या २ ठिकाणी ८ दिवसांचे ‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १०० तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. या उपक्रमांतर्गत उपस्थितांना काठी चालवणे, कराटे यांसारख्या स्वसंरक्षणात्मक भाग शिकवण्यात आले.
या वेळी अनेक प्रशिक्षणार्थींनी सांगितले, ‘‘या शिबिरामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता विकसित झाली आहे आणि त्यांना हिंदु धर्माविषयी मौल्यवान माहिती मिळाली आहे, जी त्यांना यापूर्वी ठाऊक नव्हती.’’ पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले, ‘‘अशा शिबिरांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होते.’’ या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
शौर्य म्हणजे मनाचा दृढनिश्चय ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आजच्या काळात तरुणांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शौर्य म्हणजे केवळ शारीरिक शक्ती नव्हे, तर तो मनाचा दृढनिश्चय आहे. अशी प्रशिक्षण शिबिरे तरुणांमध्ये धैर्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !