रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (रत्नागिरी) येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !

रामनाथी (गोवा) – प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे कार्य असामान्य असून भगवंताने त्यांना पृथ्वीवर पाठवले आहे. ते अवतारी पुरुष आहेत. सनातन संस्था विश्वशांतीचे कार्य करत आहे. सनातनचे साधक भाग्यवान आहेत की, त्यांना प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे सद्गुरु लाभले आहेत. या आश्रमात साधक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वत:चे मूल्यांकन करत आहेत. गुरूंविना आत्मसाक्षात्कार शक्य नाही; पण सनातनच्या आश्रमात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आत्मसाक्षात्काराचे प्रयत्न (साधना) चालू आहेत. गुरुकृपेच्या छत्राखाली रज-तम दूर करून सात्त्विकता वाढवण्यासाठी साधक प्रयत्नशील आहेत, असे मार्गदर्शन रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (रत्नागिरी) येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आश्रमातील साधकांना केले. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी अव्याहतपणे लढणारे जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी १३ जुलै २०२६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मंगलमय भेट दिली. ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूहाचे संपादक श्री. योगेश जलतारे यांनी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची ओळख करून दिली.
During His visit to Santan Sanstha's Ramanthi Ashram Jagadguru Shrimad Ramanandacharya Swami Narendracharyaji Maharaj said
Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale's , work is extraordinary, that God has sent him to Earth, and that he is an Avatari Purush. He praised Sanatan… pic.twitter.com/hWd7oH0pp8— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) July 13, 2026
Jagadguru Shri Ramanandacharya Swami Narendracharya ji met Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale, and they felicitated each other.
Speaking about Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale, Jagadguru Shri Ramanandacharya ji propounded the philosophy of Vishishtadvaita.
" As… pic.twitter.com/Wdvoy3nrM2
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) July 13, 2026
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची भेट घेतली.

‘सनातन प्रभात’ शुद्ध आहे आणि खरा आहे !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी श्री. जलतारे यांच्याकडून ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूहाच्या कार्याविषयीची माहिती विस्ताराने आणि जिज्ञासेने जाणून घेतली. ‘साधक सेवा म्हणून बातम्या आणण्याचे कार्य करत आहेत; म्हणून ‘सनातन प्रभात’ शुद्ध आहे आणि त्यामुळे तो खरा आहे,’ असे म्हणत त्यांनी साधकांना आशीर्वाद दिले.
Jagadguru Shrimad Ramanandacharya Swami Narendracharyaji Maharaj of Ramanandacharya Dakshin Peeth, Nanijdham (Ratnagiri), visited the Sanatan Ashram at Ramnathi, Goa, where Shri Yogesh Jaltare, briefed Him on Sanatan Sanstha's work for the Nation, #Dharma and spiritual research.… pic.twitter.com/YkmeGIWu1e
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) July 13, 2026
भावपूर्ण वातावरणात पार पडला सन्मान सोहळा !
मार्गदर्शनाच्या आरंभी सनातनचे साधक दांपत्य श्री. अभिषेक पै आणि सौ. सिद्धी पै यांनी गुरुपादुकांचे पूजन केले, तसेच जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे औक्षण केले. या वेळी सनातनचे पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी मंत्रपठण केले. यानंतर सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा पुष्पहार घालून आणि भेटवस्तू अर्पण करून भावपूर्ण सन्मान केला. या वेळी त्यांच्यासह आलेल्या सर्व भक्तांचाही सत्कार करण्यात आला.
Prakhar Sanatan Dharmarakshak, Anant Vibhushit Jagadguru Ramanandacharya Shri Narendraacharya Ji Maharaj, Peethadheeshwar of Ramanandacharya Dakshinpeeth, Nanijdham, Ratnagiri, graciously visited Sanatan Sanstha Ashram at Ramnathi, #Goa.
His divine arrival filled the Ashram with… pic.twitter.com/NnKSqmwF7n
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) July 13, 2026
या वेळी भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे अन् सनातनच्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !