
जोधपूर (राजस्थान) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ८ जुलै या दिवशी येथील प्रसिद्ध श्री सच्चियायमातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी देवीची खणानारळाने ओटी भरली. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे’, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केली. यानंतर त्याच मंदिरात श्रीविष्णु आणि श्री काळभैरव यांचेही मंदिर असून त्यांचेही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दर्शन घेतले अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना केली. या वेळी जोधपूर येथील साधक श्री. शीतल मोदी, सौ. स्वाती मोदी आणि श्री. शैलेश मोदी हेही उपस्थित होते.
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !