श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून तीव्र निषेध

पुणे – ‘लेट्सअप’ (LetsUpp) या ‘न्यूज पोर्टल’ने एका वृत्तामध्ये ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा उल्लेख जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करून त्यांची मानहानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘मनोहर भिडे यांनी केले (जगद्गुरु) तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य’ अशा प्रकारे त्यांचा वृत्तामध्ये उल्लेख केला आहे. या कृत्याचा निषेध म्हणून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व धारकर्यांच्या वतीने ‘लेट्सअप’ न्यूज पोर्टल आणि ‘वनव्हॉईस ट्रान्समिडिया’च्या संपादकांना थेट कायदेशीर चेतावणी देणारे ई-मेल पाठवले जात आहेत. सध्या धारकर्यांकडून मोठ्या संख्येने ई-मेल पाठवून या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
ई-मेलमध्ये म्हटले आहे की, एका ज्येष्ठ आणि वंदनीय व्यक्तीचे नाव अशा प्रकारे प्रसिद्ध करणे, हे पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांच्या विरोधी असून कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावणारे आहे. ‘न्यूज पोर्टल’ने स्वत:च्या सर्व सामाजिक माध्यमांवर तातडीने बिनशर्त आणि जाहीर क्षमा मागावी, अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने कायदेशीर मानहानीचा दावा आणि सायबर पोलिसांद्वारे न्यायालयीन कारवाई केली जाईल, अशी चेतावणी धारकर्यांनी पाठवलेल्या ई-मेलद्वारे दिली आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर