मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराजां’चे नाव देणार !

छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे या दिवशी ३६६ वी जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे

शेवगाव (जिल्हा नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी दगडफेक झाल्याचा प्रकार १४ मे या दिवशी घडला आहे. जमावाने दुकाने आणि वाहने यांची हानी करून काही प्रमाणात जाळपोळही केली.

पोर्तुगिजांवर वचक ठेवणारा सार्वभौम राजा छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती संभाजीराजांच्या वधानंतर पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधील युद्ध जवळ जवळ संपुष्टात आले; परंतु छत्रपती संभाजीराजे जिवंत असतांना पोर्तुगिजांना त्यांचा एवढा वचक वाटत होता की, ते त्यांना सार्वभौम राजा मानत होते.

संयुक्त शाहूपुरीच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज उत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना !

संयुक्त शाहूपुरी संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपतीसंभाजी महाराज उत्सवात १२ मे या दिवशी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

संयुक्त शाहूपुरीच्या वतीने भव्य छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन !

प्रथमच शाहूपुरीतील ४५ मंडळांना एकत्र करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवासाठी परिसरातील अनेक मंडळे आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे.

सातारा शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे !

शहरातील गोडोली जलाशयात (तळ्यात) हिंदवी स्वराज्य संवर्धक तथा स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयजराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा विकास करणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

१० एप्रिल या दिवशी संगम माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले. यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

पहिले पेशवे बाळाजी भट यांचे श्रीवर्धन (रायगड) येथील जन्मस्थान दुर्लक्षित !

हिंदवी स्वराज्याच्या विस्तार करणारे पराक्रमी अन् धुरंधर पहिले पेशवे म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट. हिंदवी स्वराज्यासाठी मैदान गाजवणारे बाळाजी भट हे मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील आहेत. त्यांचे जन्मस्थान येथे आहे.

सिंहगडाच्या ‘कल्याण दरवाजा’ आणि परिसर संवर्धनाच्या कामास एप्रिलमध्ये प्रारंभ होईल ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार गडाच्या विकासाकरता निधी संमत झाला आहे.

कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभुराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

या नाटकाच्या संहितेवरच बंदी घालण्याची शिवप्रेमींनी मागणी करावी. यामुळे हे नाटक कुठेच सादर केले जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते बंद पाडण्याचीही आवश्यकता रहाणार नाही !