
पुणे – छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये कसबा पेठेतील फडके चौकामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा असे शिवकालीन मर्दानी खेळ, लाईट आणि साऊंड कार्यक्रम करण्यात आले. याप्रसंगी ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी’ या मालिकेतील कलाकारांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याचे आयोजन राजेंद्र तरवडे, ‘नवदीप तरुण मंडळ’, ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’ यांच्या वतीने करण्यात आले होते. मर्दानी खेळ ‘त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ’ यांनी सादर केले. या वेळी ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी’ या मालिकेतील अजय तापकिरे, रमेश रोकडे, विश्वजित फडते, महेश कोकाटे, गणेश लोणारे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलतांना आयोजक राजेंद्र तरवडे म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.’’
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !