सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.

नागपूर येथे श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींनी ‘पोर्टेबल गुढी’ बनवली !

धार्मिक सण, परंपरा, रूढी यांचे विज्ञानीकरण करून नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार आचरण केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो, हे लक्षात घ्या ! 

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची कारणे

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्व !

‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते ? हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत.

आंब्याच्या पानांचे महत्व

ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पानात ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानात १० टक्के असते. कोवळ्या पानात तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्विक रांगोळी

देवतांचे तत्व आकृष्ट करण्याचे सामर्थ्य असणार्‍या सात्विक रांगोळ्या सणांच्या दिवशी काढा !

कडूलिंबाच्या पानांचे महत्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.