हिंदूंचे आशादायी सरकार !

अनेक संत-महात्मे ‘लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे सांगत आहेत. ‘एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिंदुत्वरक्षक मुख्यमंत्री लाभला आहे’, असे हिंदूंना वाटते. त्यांच्याकडून परिवर्तनवादी पावले उचलली गेल्यास संत-महात्म्यांची भविष्यवाणी एक ना एक दिवस खरी ठरेल आणि हिंदूंच्या मनातील हिंदु राष्ट्र साकारले जाईल !

आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेतला ! – दीपक केसरकर, प्रवक्ते, शिंदे गट

आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधीमंडळ पक्ष आमचा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. कुणीही येथे मंत्रीपदाच्या आशेने आलेले नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

‘‘संख्याबळ असतांनाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. फडणवीस यांच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.’’

प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सचिव अन् उपाध्यक्ष यांची भेट !

प्रवीण दरेकर आणि मी स्वत: नरहरी झिरवाळ अन् राजेंद्र भागवत यांची भेट घेऊन आसन व्यवस्थेच्या संदर्भात, तसेच आजारी आमदारांच्या वैद्यकीय व्यवस्थेविषयी चर्चा केली. उद्याच्या विश्वासदर्शक ठरावासाठी येथील सुरक्षा व्यवस्था चोख असावी, अशी मागणी केली.

मनसेच्या आमदाराने समर्थन देण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची चर्चा !

मनसेचा विधानसभेत १ आमदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील सत्ता स्थापनेविषयी भ्रमणभाषवर चर्चा झाली.

आज महाराष्ट्र सरकारची परीक्षा : बहुमत सिद्ध करावे लागणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील विश्‍वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता !

भाजपने सरकार स्थापनेच्या विषयी कायदेशीर चाचपणी चालू केली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे मतदान

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून या दिवशी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. निकाल घोषित होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही प्रेरणादायी ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते देहू (पुणे) येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यांत पूर्ण करणार !

भाजपपुरस्कृत सदाभाऊ खोत यांची माघार !

विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपने अपक्ष म्हणून पुरस्कृत केलेले उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत.