महाराष्ट्राला १४ सहस्र कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर परतावा प्राप्त !

केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला १४ सहस्र १४५ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर (जी.एस्.टी.) परतावा देण्यात आला आहे. ३१ मे २०२२ पर्यंतचा हा कर परतावा आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून १५ सहस्र कोटी रुपये कर परताव्याचे बाकी असल्याचा दावा केला आहे.

संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

हा मोर्चा भाजपचा नसून यात तमाम संभाजीनगरवासीय सहभागी आहेत. त्यामुळे संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संभाजीनगर येथे होणाऱ्या मोर्च्याला ५० सहस्र लोक जमवण्याचे भाजपचे लक्ष्य !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे या दिवशी महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याची सिद्धता चालू झाली आहे.

नागपूर येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आय.आय.एम्. संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन !

मिहान येथे आय.आय.एम्. संस्थेची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. ८ मे या दिवशी या इमारतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

राज ठाकरे यांच्या सभेच्या सिद्धतेला वेग, मनसे शिष्टमंडळाची संभाजीनगर येथील पोलिसांशी चर्चा !

सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते

अधिकार नसलेल्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन काय लाभ ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यात भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात चालला आहे. भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. विरोधी पक्षाला संपवण्याचे काम चालू आहे.

संभाजीनगर येथे १ मे या दिवशी राज ठाकरे यांची, तर मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा !

१ मे म्हणजे महाराष्ट्रदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

‘१४ एप्रिल’ या दिवशी १४ ‘ट्वीट’ करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदुविरोधी धोरणांची केली पोलखोल !

१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती) या दिवशी सलग १४ ‘ट्वीट’ करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदू यांच्या विरोधातील धोरणांची पोलखोल केली.

महाविकास आघाडीकडून राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विजेच्या भारनियमनाचा निर्णय घेण्यात आल्याचे घोषित केले. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.

नागपूर येथील अधिवक्ता सतीश उके यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची धाड !

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली संपत्ती हडपली आहे, असा आरोप अधिवक्ता उके यांच्यावर आहे. ‘ईडी’ने अधिवक्ता उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीक उके यांना कह्यात घेतले आहे. याआधी नागपूर गुन्हे शाखेने यापूर्वी या दोघांना चौकशीसाठी कह्यात घेतले होते.