फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

कोलकाता उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने रहित केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘देशात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही; परंतु त्यांचा अपवापर रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक भक्कम करावी लागेल.’

हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवा ! – देहली उच्च न्यायालयाचा ट्विटरला आदेश

मुळात हे सरकारने केले पाहिजे आणि अशा सामाजिक माध्यमांसाठी कठोर कायदा केला पाहिजे, जेणेकरून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचा कुणीही धाडस करणार नाही !

राजधानी देहलीत वर्ष २०१३ ते २०१९ या कालावधीत गुन्ह्यांमध्ये २७५ टक्क्यांनी वाढ !

वर्ष २०१३ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या ८६ सहस्र ८०० इतकी होती, तर वर्ष २०१९ मध्ये ही संख्या २ लाख ९९ सहस्र ४७५ इतकी झाली. ‘कॅग’च्या अहवालानुसार या वाढत्या गुन्हेगारीमागे कारण आहे, पोलिसांकडे असलेल्या साधनसुविधांची कमतरता !

केंद्र सरकारमध्ये उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणावर अहंकार ! – केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा दावा

केंद्र सरकारमध्ये अनेक ठिकाणी अहंकार असतो. विशेष करून सरकारमध्ये उच्चस्तरावर अधिक अहंकार असतो. ‘सर्वकाही आपल्याला कळले पाहिजे’ असे संबंधितांना वाटते; म्हणून कुणाचा सल्ला घेणे किंवा कुणाचे ऐकणे हे बहुतेक ठिकाणी होत नाही. कुणी १०० शंभर टक्के परिपूर्ण नसतो आणि ‘मी परिपूर्ण आहे’ असा दावा कुणीच करू शकत नाही.

‘कोजागरी पौर्णिमा’ आणि ‘करवा चौथ’ सणांच्या निमित्ताने पार पडला ‘ऑनलाईन’ प्रवचनाचा कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली अन् एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे ‘कोजागरी पौर्णिमा’ अन् ‘करवा चौथ’ यांच्या निमित्ताने एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

देहली येथे घरी पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवल्याने शेजारील धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला ठार मारण्याची धमकी !

अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या संदर्भात जे घडत आले आहे, तेच या घटनेतही झाले, हे लक्षात घ्या !

हिजबुल मुजाहिदीनच्या ४ आतंकवाद्यांना सश्रम कारावासाची शिक्षा

आतंकवाद्यांना शिक्षा करून पोसत रहाण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच देशभक्तांना वाटते !

गंगानदीच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा

स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन’चे संचालक राजीव रंजन मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार ‘गंगेच्या गुणवत्तेत वर्ष २०१४ नंतर उल्लेखनीय सुधारणा झाली आहे.

नवरात्रीनिमित्त देहली आणि एन्.सी.आर्. येथे विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे संयुक्त आयोजन