‘कोजागरी पौर्णिमा’ आणि ‘करवा चौथ’ सणांच्या निमित्ताने पार पडला ‘ऑनलाईन’ प्रवचनाचा कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा देहली अन् एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे संयुक्त उपक्रम

देहली – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली अन् एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे ‘कोजागरी पौर्णिमा’ अन् ‘करवा चौथ’ यांच्या निमित्ताने एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सौ. राजराणी माहुर यांनी कोजागरी पौर्णिमेचे वैशिष्ट्य, पूजा विधी आणि चंद्राला दूध दाखवण्यामागील कारण आदी विषयांवर माहिती दिली. यासमवेत त्यांनी करवा चौथ व्रत साजरा करण्याविषयीही माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या सत्संगाचे सूत्रसंचालन देहली येथील श्री. आलोक गुप्ता यांनी केले. या सत्संगाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.