गंगानदीच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा

गंगा नदी

नवी देहली – ‘स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन’चे संचालक राजीव रंजन मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार ‘गंगेच्या गुणवत्तेत वर्ष २०१४ नंतर उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. त्या वेळी ९७ स्थानांपैकी ६८ स्थानांजवळील पाणी ‘जैव रासायनिक ऑक्सिजन’ (बीओडी) मानकाच्या अनुरूप आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अपेक्षित न्यूनतम मानकापेक्षा अधिक आहे. वर्ष २०१४ मध्ये केवळ ३२ ठिकाणी पाणी मानकानुसार होते.’