नवरात्रीनिमित्त देहली आणि एन्.सी.आर्. येथे विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे संयुक्त आयोजन

देहली – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने देहली अन् एन्.सी.आर्. येथे नवरात्रीनिमित्त विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीचे श्री. अरविंद गुप्ता यांनी ‘नवरात्रीचे महत्त्व आणि उपासना’ यांविषयी सोप्या भाषेमध्ये माहिती दिली. सनातन संस्थेच्या कु. टुपूर भट्टाचार्य यांनी दसरा सणाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व विषद केले. शेवटी श्री. गुप्ता यांनी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन केले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन श्री. आलोक गुप्ता यांनी केले. या व्याख्यानाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

क्षणचित्रे

सत्संगामध्ये कु. टुपूर भट्टाचार्य यांनी सर्वांकडून मानसपूजा करवून घेतली. मानसपूजा करतांना जिज्ञासूंना ‘मन निर्विचार होणे, सूक्ष्म सुगंध येणे आणि देवीचे अस्तित्व जाणवणे’, अशा अनुभूती आल्या.