१. राघवेंद्र माणगावकरकाका यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ‘मी मागील ४ वर्षांपासून माणगावकरकाकांच्या शेजारी रहाते. तेव्हा ‘काका पुष्कळ वेळा भावस्थितीत असायचे’, असे मला जाणवत असे.
आ. त्यांच्याशी बोलतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे नाव उच्चारले, तरी त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू यायचे.
इ. काका अल्प बोलायचे आणि अधिकाधिक नामजप करायचे. काकांना मी कधीच व्यावहारिक अडचणींबद्दल बोलतांना पाहिले नाही. ते सतत ‘नामजप कसा होईल ?’, यासाठीच प्रयत्न करायचे.
ई. ‘ते सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवायचे.
२. माणगावकरकाका यांचे निधन झाल्याचे कळताच साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !
३.३.२०२४ या दिवशी मला राघवेंद्र माणगावकरकाका यांचे निधन झाल्याचे समजले. तेव्हा मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘स्थूलदेह सोडताक्षणी माणगावकरकाका सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे गेले आहेत. काका त्यांच्या समोर उभे आहेत. त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वहात आहेत. काकांच्या संपूर्ण देहाभोवती अर्धा मीटरपर्यंत प्रकाश दिसत आहे. ते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना म्हणत आहेत, ‘तुम्ही मला मुक्त केले’, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’ ‘या वेळी काकांनी जो पोषाख परिधान केला होता, तोच पोषाख प्रत्यक्षातही काकांच्या मृतदेहावर होता’, असे माझ्या नंतर लक्षात आले.
वरील दृश्य दिसत असतांना मला एक तळपट्टी दिसली. तिच्यावर लिहिले होते, ‘पहाटे ४.३० वाजता.’ तेव्हा मला वाटले, ‘काकांचे निधन पहाटे ४.३० वाजता झाले असावे.’ त्यानंतर दुपारी मला काकांचे निधन पहाटे ४.३० वाजता झाले असल्याचे समजले.
३. अंत्यविधीच्या वेळी जाणवलेले सूत्र
काकांचे अंत्यविधी पहात असतांना मी प्रार्थना करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘काका प्रकाश रूपाने वेगाने वर वर जात आहेत’, असे दिसले. या दृश्यात मला प्रकाशासह त्यांचा स्थूलदेह वर जातांना दिसला नाही. तेव्हा ‘काका कुठेही अडकले नसून त्यांना पुढची गती मिळाली आहे’, असे मला जाणवले.’
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा. (७.३.२०२४)
|