सुरेश जाखोटिया यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘२.३.२०२४ या दिवशी सांगली येथील सुरेश जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६५ वर्षे) यांचे हृदयविकाराने निधन झाले. १३.३.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘जाखोटियाकाका मितभाषी होते.
२. प्रेमभाव : ते घरी आलेल्या व्यक्तींचे प्रेमाने आदरातिथ्य करत असत.
३. तळमळीने सेवा करणे : त्यांच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरण करण्याची सेवा होती. ते ही सेवा नियमित आणि समयमर्यादेत करत असत. ते पुष्कळ पाऊस किंवा थंडी असतांनाही ही सेवा करत असत.
४. जाखोटियाकाकांचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
अ. काकांचे अंत्यदर्शन घेतांना मला ‘ते झोपले आहेत’, असे वाटत होते.
आ. ‘ते श्वासोच्छ्वास करत आहेत’, असे मला जाणवत होते.
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०२४)