भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर खाते ‘हॅक’ !

  • हॅकर्सकडून (अनुचित व्यक्तींकडून) खात्याचे नाव आणि ‘प्रोफाईल फोटो’ यांत पालट !

  • खाते पूर्ववत् झाल्याचे मंत्रालयाची माहिती

‘ट्विटर’सारखी सामाजिक माध्यमे ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात, त्याच मंत्रालयाचे ट्विटर खाते जेथे हॅक होते (नियंत्रित केले जाते), तेथे सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यांची सुरक्षितता कधीतरी राखली जाऊ शकेल का ? – संपादक

नवी देहली – भारताच्या केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे ‘ट्विटर’ खाते  १२ जानेवारीला ‘हॅक’ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हॅकर्सकडून खात्याचे नाव आणि ‘प्रोफाईल फोटो’ यांत पालटही करण्यात आला होता.

हॅकर्सने प्रोफाईलवर ‘एलन मस्क’ यांच्या नावासहित माशाचे छायाचित्र लावले होते. हे लक्षात आल्यावर लगेचच खाते पूर्ववत् करण्यात आले. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने ‘ट्वीट’ करत या घटनेची माहिती दिली. मागील मासात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ट्विटर’ खातेही ‘हॅक’ करण्यात आले होते.