पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाकडे ११ कोटींच्या खंडणीची मागणी !

संजीव बजाज

पुणे – येथील बजाज फायनान्स आस्थापनाचे संजीव बजाज यांना आस्थापनाचा ‘डाटा हॅक’ (संगणकाच्या माध्यमातून माहिती चोरून घेणे) करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ११ कोटी ६३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे.

बजाज यांना ई-मेलद्वारे (संगणकीय पत्र) खंडणी मागण्यात आली असून ती न दिल्यास आस्थापनाची मोठी हानी केली जाईल, अशी धमकीही ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. हा ई-मेल २८ नोव्हेंबर या दिवशी मिळाला असून या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात बजाज फायनान्समधील अधिकारी युवराज मोरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.