शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर कह्यात !

  • पात्र विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय कोण आणि कसा भरून काढणार ?
  • मंत्रालयातील आय.ए.एस्. दर्जाचे अधिकारीही अशा प्रकरणामध्ये सामील असल्याने भ्रष्टाचाराची भयावहता लक्षात येते. अशा लाचखोर अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !
शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर (डावीकडे)

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या अपव्यवहारात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना ठाणे येथून कह्यात घेतले आहे. खोडवेकर सध्या मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव आहेत.

वर्ष २०१९ – २० मधील शिक्षक पात्रता परीक्षेच्या अपव्यवहाराचे पुणे पोलिसांची सायबर गुन्हे शाखा अन्वेषण करत आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असतांना खोडवेकर यांनी शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैसे घेतल्याची माहिती शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे यांनी चौकशीत दिली. त्यानंतर खोडवेकर यांना कह्यात घेतले अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.