गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध तडीपार

गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध लाल अहमद महिबूब कुरेशी याची विविध स्तरांवर चौकशी होऊन पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोलापूर यांनी त्यास सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका येथून एक वर्षासाठी तडीपार आदेश जारी केला आहे.

वणी पोलिसांकडून गोवंश तस्करी करणारी ५ वाहने जप्त आणि ८ जणांना अटक

वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला.

गोपालनाचे अर्थकारण !

कोणत्याच प्राण्याला सांभाळणे, हे म्हणावे तसे सोपे नाही. त्यातच देशी गायींची काळजी घेणे, हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पहाता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात पुष्कळ महत्त्व आहे.

भोसे (मिरज) येथील कांबळे कुटुंबियांनी घातले देशी गाईचे डोहाळे जेवण 

मिरज पंचायत समितीचे सदस्य कृष्णदेव कांबळे यांच्या आईवडिलांना मुलगी नव्हती. याची खंत त्यांना मनात नेहमी होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘लक्ष्मी’ नावाच्या देशी गायीचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला आहे. या गायीचा १ जानेवारी या दिवशी कांबळे कुटुंबियांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला.

गोमाता आणि डुक्कर !

भारतासह जगातील काही मुसलमान संघटनांनी दावा केला आहे, ‘कोरोनाची लस बनवतांना त्यामध्ये डुकराची चरबी वापरण्यात आली आहे’, तर भारतात हिंदु महासभेने शंका व्यक्त केली आहे, ‘यामध्ये गोमांसाचा वापर करण्यात आला आहे.’ मुसलमानांनी थेट यावर बहिष्काराचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याने त्याला अनुमती नाकारावी !

जर मुसलमान आणि हिंदु या लसीद्वारे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवत आहेत, तर सरकारने या लसीमध्ये कोणत्या घटकांचा वापर करण्यात आला आहे, हे अधिकृतपणे घोषित करावे, असेच जनतेला वाटते ! – स्वामी चक्रपाणी, हिंदू महासभा

पनवेल येथे गोवंश मांसाची वाहतूक करणार्‍या चार धर्मांधांना अटक

राज्यात गोवंशहत्या बंदी असूनही कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूकही चालू आहे !

विश्‍वविद्यालये आणि महाविद्यालये यांठिकाणी देशी गायीच्या पालनाचे महत्त्व शिकवण्यावर वेबिनारमध्ये चर्चा !

गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्यात गोमांस विक्रीची दुकाने बंद

गोव्यात गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोमांस विक्रीची दुकाने १२ डिसेंबरपासून बंद आहेत. नाताळाला प्रारंभ होण्यासाठी १५ दिवसच बाकी असल्याने यापुढे गोमांसाचा तुटवडा होऊ नये, यासाठी गोमांस विक्रेते जिल्हा पंचायतीची मतमोजणी झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून त्यांच्यावर दबाव आणण्याच्या सिद्धतेत आहेत.

भिवंडी येथे गायींची वाहतूक करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पोलिसांनी गायी पळवणारी ही टोळी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सोडून पळ काढला; मात्र गायींना गाडीत कोंबून पळवणार्‍या टोळीच्या मागे लागलेल्या पोलिसांचे पाठलाग करतांनाचे दृश्य येथील पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही छायाचित्रकामध्ये कैद झाले आहे.