विश्‍वात भारतगौरव होण्यासाठी काय कराल ? 

सौ. नम्रता दिवेकर
  • आज देशप्रेम हरवत चाललेले आहे. खर्‍या इतिहासाची ओळख तरुण पिढीला करून द्यायला हवी.
  • केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवशी देशप्रेम जागृत करायचे नसून ३६५ दिवस देशप्रेमाचे धगधगते अग्निकुंड प्रज्वलित रहायला हवे.
  • नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा र्‍हास आणि पर्यावरणीय असमतोल टाळण्यासाठी प्रयत्न करावा.
  • ‘भाषणस्वातंत्र्य’ हा मिळालेला अधिकार सामाजिक माध्यमांमध्ये व्यक्त करतांना भारतियांनी समाजभान जोपासावे.
  • लोकशाहीच्या आधारस्तंभांना कीड लागलेली असल्याने लोकशाही दिवसेंदिवस तकलादू होत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच आपल्याकडून देशविघातक कृत्य होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • भ्रष्टाचार, गुन्हेगारी, खलिस्तान, बलात्कार, नक्षलवाद मुक्त भारत होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
  • राजकीय इच्छाशक्ती आणि नैतिकतेवर आधारित राजकारण असल्यासच देशातील समस्या दूर होतील, हे लक्षात ठेवावे.
  • नैराश्याकडे झुकून आत्महत्या करणारा तरुण नव्हे, तर ध्येयवादी आणि देशप्रेमी तरुण निर्माण करणे आवश्यक आहे.
  • भारतातील प्रत्येक स्त्री म्हणजे भारतमातेचेच रूप आहे. प्रत्येकानेच तिला जपायला हवे आणि तिचे संरक्षण करायला हवे.
  • बेशिस्तपणाचे वर्तन करून आणि परिसर अस्वच्छ करून स्वातंत्र्याची लाज घालवू नका, तर दायित्वाचे भान राखत स्वातंत्र्य टिकवा !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.