भारतियांनो, तेच तुम्ही जे विदेशांतील दंडविधान, नियम, पद्धती, रुढी-परंपरा या सर्वांचे पालन करणारे भारतात मात्र हे सर्व पायदळी तुडवतांना दिसता. भारतात परतल्यावर धूम्रपानाची वेष्टने-कचरा रस्त्यावर टाकणारे, बिनदिक्कतपणे थुंकणारे तेच तुम्ही भारतीय नागरिक ! जर तुम्ही परक्या देशात एक उत्तरदायी, करदार, संवेदनशील नागरिक म्हणून वागू शकता; तर मग आपल्या देशातही तसे का वागत नाही ? आपल्या देशाची झालेली दुरवस्था सुधारून त्यांचा परिपोष करण्याची इच्छा, सिद्धता असायला हवी. याविषयी सर्व भारतवासियांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या देशाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, ते प्रथमतः आपण देशाला देण्याचा प्रयत्न करायला हवा. तसे झाल्यासच आपण गौरवशाली भारताचे नागरिक म्हणून पात्र होऊ !
(संदर्भ : मासिक ‘सत्यवेध’)