
१. राष्ट्रपुरुषाचा आनंदमय कोष
‘आपले शरीर पंचकोषांनी बनलेले असते. स्थूल शरीर अन्नमय कोष आहे. त्यानंतर प्राणमय, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष मिळून शरिरात आत्म्यापर्यंत जिवंतपणा असतो. आमच्या राष्ट्रपुरुषाचे शरीरही अशाच प्रकारच्या पंचकोषांचे बनलेले असते. देशाची भूमी हे त्याचे स्थूल शरीर आहे आणि देशातील प्रजा त्याचा प्राणमय कोष आहे. राष्ट्राची भाषा त्याचा मनोमय कोष असून देशाची संस्कृती त्याचा विज्ञानमय कोष आहे. धर्म हा राष्ट्रपुरुषाचा आनंदमय कोष आहे.
२. राष्ट्रपुरुषाच्या शरिरांचे विष्णुपुराणातील वर्णन !
राष्ट्रपुरुषाच्या स्थूल शरिरांचे (सीमांचे) वर्णन विष्णुपुराणात अशा प्रकारे आले आहे.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ॥
– विष्णुमहापुराण, अंश २, अध्याय ३, श्लोक १
अर्थ : हिंद महासागराची उत्तर दिशा आणि हिमालयाची दक्षिण दिशा यांच्यामध्ये असणार्या भूमीला ‘भारत’ असे म्हणतात आणि तेथे राहणार्या लोकांना ‘भारती’ असे म्हणतात.

हिंदी महासागराच्या उत्तर दिशेला आणि हिमालयाच्या दक्षिण दिशेला पसरलेल्या भूमीला ‘भारत’ असे म्हणतात आणि त्यामध्ये निवास करणार्यांना ‘भारतीय’ असे म्हणतात. या सीमा मानवनिर्मित नाहीत. स्वतः परमात्म्याने त्या सीमा निर्माण केल्या आहेत.
हिमालयं समारभ्य यावत् सिन्धुसरोवरम् ।
तद्देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ॥
– बार्हस्पत्यशास्त्र
अर्थ : हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या देवनिर्मित देशाला हिंदुस्थान असे नाव आहे.
३. भारताचे इंग्रज शासक लॉर्ड वैवल आणि इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान सर क्लीमेन्ट एटली यांनाही म्हणावे लागले, ‘‘तुम्ही या देशाचे विभाजन करू शकत नाही; कारण हा देश देवतांद्वारे बनवलेला आहे. तो त्रिभुजा आहे.’’

४. …आणि राष्ट्रपुरुषाचे मन मलीन झाले !
देवनिर्मित या राष्ट्राचा मनोमय कोेष, म्हणजे त्याच्या अभिव्यक्तीचे माध्यम देववाणी संस्कृत असून अन्य भारतीय प्रांतीय भाषा (किंवा विश्व भाषा) तिची संतानेच आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या राष्ट्रवाद्यांनी राज्यघटनेच्या सभेत संस्कृतला राष्ट्रभाषा (राजभाषा) बनवण्याचा ठोस प्रस्ताव मांडला होता; मात्र आपल्या संस्कृतीशी अनभिज्ञ असलेल्या आणि पाश्चात्त्य संस्कृतीने पछाडलेल्या राजकीय नेत्यांनी निश्चितपणे त्या ठिकाणी भोगवादी पाश्चात्य संस्कृतीची वाहक असलेल्या इंग्रजीला आरूढ करून राष्ट्रपुरुषाचे मन मलीन करण्याचे कुकर्म केले आहे.
५. मूळ संस्कृतीला संपवण्याचा खटाटोप !
राष्ट्रपुरुषाचा विज्ञानमय-कोष, म्हणजे भारतीय संस्कृती अनेक आघात सोसूनही अजूनपर्यंत टिकून आहे; परंतु मागील सरकारांनी आपले अज्ञान आणि एक गठ्ठा मतदानाचे राजकारण केले. स्वतःच्या क्षुद्र स्वार्थापोटी भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक असलेले राम, कृष्ण, प्रताप, शिवा, दयानंद आणि इतर राष्ट्रभक्त होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःचा प्राणत्याग करून बलीदान देणार्यांसहित सर्व राष्ट्रपुरुषांचे चरित्र विद्यालयातील पाठ्यक्रमापासून दूर करून मूळ संस्कृतीला संपवण्याचा खटाटोप केला होता.
६. राष्ट्रीय ऐक्य जोपासणार्यांचा छळ !
पंथनिरपेक्षतेच्या विकृत स्वरूपाने भारतीय राज्यघटनेला धर्मनिरपेक्षतेच्या नावावर सनातन धर्माचा मूलाधार असलेले वेद आणि वेदादि सद्साहित्याला तर यापूर्वीच पाठ्यक्रमातून दूर केले आहे. या सेक्युलर सरकारांनी धर्माच्या साक्षात् मूर्तीस्वरूप महापुरुषांनाही पाठ्यक्रमातून बाजूला काढून भारताच्या संततीला घोर अज्ञान आणि अधर्म यांच्या अंधकारात ढकलण्याचा प्रयत्न केला. जगातील तथाकथित सेक्युलर देश अमेरिका आणि ब्रिटन स्वतःला ‘ईसाई राष्ट्र्र’ म्हणवण्यात गर्वाचे मानतात. ते आपल्या राजकोषातील भरपूर धन ईसाइयतच्या प्रचारासाठी जगातील अन्य देशांमध्ये खर्च करतात. भारताचे दुर्मती सरकार या देशाचे ईसाईकरण करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करणार्या विदेशी महिला असलेल्या मदर तेरेसाला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान देत आहे. राष्ट्र संत, संन्यासी आणि धर्म संस्कृती यांचा आपल्या येथे प्रचार-प्रसार करून भारतात राष्ट्रीय ऐक्याची भावना जपण्यासाठी स्वतःचे जीवन अर्पित करणार्या लोकांना कारागृहात बंद करून त्यांचा छळ करण्यात येत आहे.
७. स्वदेशी भाषा, वेश आणि विचार यांची पुनर्स्थापना हवी !
परदेशातून आयात केलेली इंग्रजी भाषा, आयात केलेली परकीय पाश्चिमात्य संस्कृती यांसहच भ्रष्टाचार, महागाई, काळा पैसा आणि आतंकवाद या समस्याही या अपसंस्कृतीची सहउत्पादने (Byproduct) आहेत. स्वदेशी भाषा, वेश आणि विचार यांची पुनर्स्थापना करूनच भारतीय प्रजासत्ताक राष्ट्र स्वतंत्र आणि स्थिर राहू शकेल, हे अटळ सत्य स्वीकारून अग्रेसर होण्याचा संदेश देण्यासाठीच हा ‘प्रजासत्ताक दिन’ येत असतो.’
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, वर्ष १२, अंक १०, जानेवारी २०२२)