
राष्ट्रीयतेचा विचार भारतीय तत्त्वज्ञानातील विशिष्टाद्वैत या अद्वैत-विचारप्रणालीच्या रूपाचा आहे. विश्वात्मक दृश्यतेतील अभिन्न आणि अखंड सूत्र लक्षात घेऊन राष्ट्र नावाचा एक भावनिक विलास वेगळेपणाने करण्याची मानवसमूहांत व्यवस्था राखणे, हे विशिष्ट अद्वैतच होय. राष्ट्रीयतेच्या भावनेमागे जे तत्त्वज्ञान आहे, ते शुद्ध भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे राष्ट्र हा अद्वैताचा विश्वात्मक भावनेवरील महत्त्वपूर्ण टप्पा होय. राष्ट्र हा विश्वाचा एक विशाल आणि व्यापक घटकच आहे; म्हणून भारतीय तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेली राष्ट्रीयतेची भावना ही संस्कृतीनिष्ठ, चारित्र्यपूर्ण, सहकारी आणि सहयोगवादी जीवननिष्ठ विचारप्रणाली होय.
(संदर्भ : स्मरणिका, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४५ वे अखिल भारतीय अधिवेशन, ग्वाल्हेर (वर्ष १९९०)
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !