श्रीराममंदिराच्या पार्श्वभूमीवर ७५ सहस्र पुणेकरांनी केले रामरक्षास्तोत्र पठण !

अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने १४ जानेवारी या दिवशी ७५ सहस्र पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तीमय वातावरणात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षास्तोत्र पठण केले.

वाराणसीतील ज्योतिषी गणेश्‍वर शास्त्री द्रविड आणि पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांची मुख्य आचार्यपदी नियुक्ती

अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता पूर्ण झाली आहे. याच क्रमाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने कार्यक्रमाच्या मुख्य पुजार्‍यांची घोषणा केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून चालू झाली आहे.

वर्ष १९९० मध्ये १२५ कारसेवकांना आश्रय देणार्‍या श्रीमती ओम भारती यांना उद्घाटनाचे निमंत्रण !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी ८ सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात श्रीमती ओम भारती यांचाही समावेश आहे. वर्ष १९९० मध्ये राज्यात मुलायम सिंह यांचे सरकार असतांना अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता.

KS Chithra : श्रीरामाचा जप करण्याचे आवाहन करणार्‍या प्रसिद्ध गायिका चित्रा यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केले होते आवाहन ! अन्य वेळी धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा ढोल बढवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?

Ayodh Rammandir Consecration : श्रीराममंदिराचे बांधकाम अपूर्ण असूनही देवतेची प्रतिष्ठा शास्त्रसंमत ! – गणेश्‍वरशास्त्री द्रविड

‘श्रीराममंदिराच्या कळसाचे काम पूर्ण झाल्याखेरीज अपूर्ण असलेल्या मंदिरात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणे योग्य नाही’, असा आक्षेप अनेकांकडून घेतला जात आहे.

Swami Rambhadracharya Maharaj : पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी स्वामी रामभद्राचार्य महाराज करत आहेत यज्ञ !

प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो; मात्र आमची इच्छा इतकीच आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. आम्हाला निश्‍चिती आहे की, ते नक्की होईल.

राज्यातील मंदिरात लावण्यासाठी ‘श्रीराम जीवन चित्र प्रदर्शन’ !

राज्यातील सर्व मंदिरांनी २२ जानेवारी या दिवशी या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करावे, असे आवाहन मंदिर तथा अर्चक-पुरोहित संपर्क आयामाचे अनिल सांबरे यांनी केले आहे.

सांगली येथे ‘मंगल कलश शोभायात्रा’ आणि ‘श्री तुलसीदास रामायण कथा वाचन’ यांचे आयोजन ! 

अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण महोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री बालाजी मंदिर संचालित श्री सीताराम मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘भव्य मंगल कलश शोभायात्रा’ आणि ४ दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने ‘अयोध्या सप्ताह आनंद सोहळ्या’चे आयोजन !

जळगावनगरीचे ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थान हे कान्हादेशातील प्रमुख संस्थानांपैकी आहे. या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे.

रामराज्याची नांदी !

श्रीरामाने ज्याप्रमाणे वानरसेनेला घेऊन रामसेतू बांधला, त्याप्रमाणे संतांनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी नागरिकांचे संघटन करावे. तसे झाल्यासच श्रीरामाची कृपा होऊन रामराज्य अवतरेल.